Close

Santosh Awale

तारळेस्थित प्रसिद्ध आवले घराण्यातील त्रिमूर्तीपैकी शिरवळस्थित मधली मूर्ती,

सिव्हिल क्षेत्रातील आपल्या कर्मयोगाने ही मिळवतेय कीर्ती!

प्रोफेशनने नुसताच इंजिनियर नाही तर हा अनुभवाने फार्मासिस्ट ही आहे,
डिग्री जरी नसली तरी संपूर्ण मेडिकल स्वबळावर चालविण्यास भाई समर्थ आहे!

दिल्ली, गुजरात, पंजाब, शिरवळ असा आहे याच्या कर्मभूमीचा पश्चिमोत्तर प्रवास,
त्यायोगे विधविविध राज्यांचे विधविविध अनुभव हा याच्याकडे जमा झालेला खजिना आहे खास!

तरीही या खजिन्याच्या पलीकडे जाऊन याला आपल्या जन्मभूमीची आहे प्रचंड ओढ,
काहीही झाले तरी 'भीमसेन यात्रा अन दिवाळी दिवशी तरी आपण तारळ्यातच असलो पाहिजे' अशी याची निड आहे गोड!

कोणत्याही गोष्टीला एक विशिष्ट वळण देऊन त्यांना विशिष्ट व्यक्तींच्या आदर्शांवर आणून सोडणे हे याचे जणू कौशल्य,
तारळे पंचक्रोशीतील असंख्य हिट व्यक्तिरेखांचं याच्या विनोदांमध्ये दिसून येतं प्राबल्य!

एखादे व्यक्तीचित्र पाहून त्याला हुबेहूब कागदावर गिरवणारा आहे हा चित्रकार,
कोंडकेंचे दादा यांचे आदर्श, चपखल वापरतात हे आकार अन ऊकार!

अशा खवट शब्दप्रयोगांनी नटलेली चावट विनोदबुद्धी हा याच्या स्वभावाचा आहे विशेष गुण,
ल, प, च, ब सारख्या छोट्या छोट्या अक्षरांवर याचं विलक्षण प्रेम पाहून जाल तुम्ही मोहून!

माझ्या वयाच्या टप्प्याटप्प्यावर आमच्यासाठी कधी नंदोष, कधी तात्या, कधी संतोष तर कधी प्रिन्स असलेल्या या बहुनामी, बहुआयामी, विनोदी, अ गप्पाप्रेमी व्यक्तिमत्वाला आहे आमचा सलाम,
हसते रहो हसाते रहो वाले तात्यासाहेब, वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो आम्ही तुम्हाला, तुमचे सवंगडी तमाम!!

वाढदिवसाच्या अरबो खरबो शुभेच्छा संतोषशेठ आवले!! 

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...