Close

Simit Nyati

पुण्याच्या शाहू कॉलेजमधून ज्यांनी केलंय वकिलीच्या डिग्री चे संपादन,

पाचोऱ्याच्या सुप्रसिद्ध माहेश्वरी उर्फ न्याती घराण्यातील नामवंत वकील हे आज त्यांचं प्रोफेशन!

प्रोफेशननेच वकील त्यामुळे घंटा बोलायला कोणाला ऐकत नाहीत,
एखाद्या विषयावर यांच्याशी अर्ग्युमेन्ट करायची वेळ आली तर यांच्या सविस्तर तर्कसंगत मुद्यांसमोर कोणी टिकत नाही!

अखंड जळगाव जिल्ह्याच्या रेल्वे परिवहनाची सूत्रे यांच्याकडूनच हालतात,
कोणत्या ट्रेन चा कधी काय स्टेटस आहे हे लोग्झ यांनाच विचारतात!

पाचोरा जळगाव प्रवासात गेमिंग पसंद करणाऱ्या शेठचा सध्या अमेझॉन प्राईम वरती तडाखा आहे,
दोन तीन सेशन्स मध्ये मुव्हीचा खात्मा पक्का आहे!

खाणे अन खाऊ घालणे याची राजेंना हौस भारी,
बील द्यायला गेलात तर यांचे खाते असलेलीच मिळतील दुकाने सारी!

पुण्यात आले की सारस बागे जवळची भेळ राजे अजूनही न चुकता खातात,
त्यांच्या इलाक्यात गेलात तर कधी चायनीज, कधी चाट फॉलोड बाय आईस्क्रीम पान खाऊ घालून तुम्हाला खुश करून टाकतात!

खाण्याप्रमाणेच साहेबांना फिरायचीही भारी आवड,
कोणते ना कोणते पर्यटनस्थळ भटकून येतात बस मिळाली पाहिजे यांना कामातून सवड!

आम्हाला पाहुणे म्हणून संबोधणारे बस काही वर्षांपूर्वी आमच्या जीवनात आलेले पण जणू आयुष्यभराचे लागेबांधे असल्याचे पदोपदी जाणवून देणारे आमचे लाडके मेहुणे, आमच्या छोट्या अन्वीचे मोठे मामा, दि ग्रेट ह्यूमन बियिंग, ऍडव्होकेट श्री सिमीतजी न्याती यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!

With love & regards

- D For Darshan 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...