Close

Sandip Mali

मूळचा तारळ्याचा सुपुत्र असलेला आमचा कमालीच्या शांत अन सभ्य स्वभावाचा लंगोटीयार,

प्रत्येक तरुणाच्या आयुष्यातील स्वप्नापैकी स्वतःच घर करण्याचं स्वप्न मुंबई सारख्या स्वप्ननगरीमध्ये स्वहिमतीवर स्वमालकीचे घर करून पूर्ण केलेला हा अमुचा फटट्या आहे फुल्ल तयार!

यशाचा खरा आनंद हा यशप्राप्तीमध्ये नसून त्या दिशेने केलेल्या प्रवासात आहे सारख्या विचाराचे आहे हे चालतेबोलते उदाहरण,
स्वप्ने पहात रहाणे आणि पाहिलेली स्वप्ने मेहनतीने सत्यात उतरवत जाणे या संकल्पनेची पुर्ती करत गेलंय याचं आजतागायतचं जीवन!

जात्याच आहे याच्यात नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, समंजसपणा सारख्या साऱ्या मुल्यांचं शिक्षण,
पान तंबाखू बीडी काडी दवा दारू सारखं ना कसलं याला व्यसन ना दूर दूर पर्यंत लागायचं लक्षण!

शाळा कॉलेजात आपले मोत्यासारखे वळणदार मोहक हस्ताक्षर अन त्याच स्टेडी हातांनी केलेलं चित्र आकृत्यांचं रेखाटन यांत ब्रोचा हातखंडा होता कमालीचा,
अर्थातच क्रिकेटचा दिवाना हा नादही करायचा खोखो कबड्डी सारख्या सांघिक खेळांचा!

असं असताना माणूस अभ्यासात हुशार राहिला नसेल तर नवल,
ऍकॅडमिक्स च्या टप्प्या टप्प्यावर आपली गुणवत्ता सिद्ध करत याने मिळवलेलं यश अर्थातच आहे धवल!

मर्चंट नेव्ही मध्ये करियर करायचा विचार करताना डॉक्तर होण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत शेवटी फार्मसी कडे स्विच मारून हा कराड गव्हर्नमेंट कॉलेज मधून औषध विज्ञानशास्त्राचा उच्च पदवीधर झाला,
नुसताच उच्च पदवीधर नाही तर विद्यापीठात गोल्ड मेडलिस्ट होऊन हा युनिव्हर्सटीत सर्वोच्चही ठरला!

नामांकित औषध कंपन्यांमध्ये रिसर्च ऑफिसर म्हणून काम केलेला हा भाऊ आज प्रोफेशन ने आहे शास्त्रज्ञ,
आत्ताच सातासमुद्रापार दौरे करून अमेरीकन्सना ट्रेनिंग देऊन आलाय हा कंपनीचा मॉलिक्युल तज्ञ!

असा हा शांत, संयमी, निगर्वी, स्थितप्रज्ञ, मितभाषी, महत्वाकांक्षी स्वभावाचा प्रेमा जिव्हाळ्याची खाण असलेला इस्लामपूरचा जावई होऊन आज प्रिशारुपी गोड मुलीचा बाबा झालेला आमचा स्कुलमेट, कॉलेजमेट, रुममेट फ्रेंड कम ब्रो, नन ऑदर द्यान संदीप उर्फ सँडी यांस प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!! परवा पार सिंगापूर ला वुइथ फॅमिली बर्थडे सेलिब्रेट करायला निघालाय शेठ, प्लॅन करताना येणाराय का म्हणून विचारायचं तरी होतं एवढीच काय ती यावर्षीची माझी तुझ्याकडून राहून गेलेली इच्छा!! 

बाकी, येणारं वाढवर्ष तुला सालाबादप्रमाणेच निर्विवाद सुखसमृद्धीचे जाओ!! हॅपी बदडे सँडी!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...