Close

Sachinsir Wagdole

वागडोळे गुरुजी!

तुमच्या वाढदिनी तुमच्यावर काव्य करू का निबंध लिहू हाच एक सवाल आहे!
करावं छोट्या छोट्या ओळींमध्ये तुमच्या झगमगीत व्यक्तिमत्वाचं रसभरीत वर्णन,
का लिहावा लांबलचक लेखच जिथे लिखाणाला नसेल कसलेच बंधन!
कारण थोड्या थोडक्या शब्दांत व्यक्त करता येईल असं तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच नाही,
असंख्य गुणांच्या अगणित छटा गुरुजी आहेत तुमच्या ठायी!

पाहू आठवेल तसं लिहीत जातोय, तुमच्या कलागुणांनी माझ्या बालबुद्धीवर केलेल्या प्रभावाचं या अनुषंगाने संकलन करतोय!

बाल्यावस्थेपासूनच तुमचं चित्रनगरीप्रतीचं विचित्र आकर्षण सर्वश्रुत आहे, एक नट जसा विविध भूमिकांमध्ये नटतो तत्सम विविध भूमिकांचं सचित्र दर्शन तुमच्या एका उभ्या आयुष्यात आहे!

लहानपणी यदा यदा ही धर्मस्य, ग्लानिर्भवती भारत म्हणत तुमच्या हनुमान पेठ गणेशोत्सव मंडळाचा पडदा उघडायचा, त्या पडद्यामागे द्रौपदी वस्त्रहरण मधली द्रौपदी, शिशुपालाच्या वध मधला श्रीकृष्ण, भीष्मप्रतिज्ञेतला भीष्म वगैरेंच्या रूपाने दिसणारा तुमच्यातला कसलेला नायक आम्हाला कमालीचा भावायचा!

एक अभिनेताच नाही तर तुमच्या ठायी असलेला एक उत्कृष्ट दिग्दर्शक ही आपली जबरी छाप पाडायचा, तुमच्या अष्टविनायक दर्शन वा कारगिल वीरांना श्रद्धांजली सारख्या भव्यदिव्य देखाव्यांचा भार तो आपल्या खांद्यावर सकुशल सांभाळायचा!

अभिनय अन दिग्दर्शन याच्या पलीकडे जाऊन पाच-पंचवीस जणांचे पाच-पंचवीस मेंदू सांभाळत त्यांना अशा पद्धतीच्या विशिष्ट प्रेरणेने एकत्र आणून एक संघ निर्मिती करणारा तुमच्यातला कुशल संघटक कसा नजरेआड राहणार,
वडीलबंधुच्या रोल मध्ये आपल्या भर तरुणाईतूनच कुटुंबाचा कार्यभार सांभाळणारे गुरुजी, तुमच्या ठायी असलेले हे संघटन कौशल्य कमालीच्या आदराने पाहिले गेलेय अन पाहीले जाणार!

नेतृत्वगुणांनी सजलेले तुमचे हेच संघटन कौशल्य तारळे जिमखाण्याची बांधणी अन नेतृत्व करतानाही दिसले,
अखंड पंचक्रोशीत दबदबा निर्माण करणारे क्रिकेट तुम्ही त्या पिरियड मध्ये खेळले!

कमालीच्या धीरगंभीर मुद्रेने चार पावले चालत येत अचानक गोळीच्या वेगाने गुडघ्या पेक्षा कमी बाऊन्स वाला बॉल टाकणारी तुमची गोलंदाजी केवळ अद्भुत होती,
स्टेडियम वर ऑफ साईड ला लावलेली सहा सहा फिल्डर्स ची फळी भेदून चौकारांवर चौकार खेचणारी तुमची फलंदाजीही कहर होती!

आपल्या अभिनय कौशल्याने स्टेज अन सांघिक क्रीडाकौशल्याने मैदान गाजविणाऱ्या गुरुजींमधला एकेकाळी गजराज पेंटस नावाने क्रिएटिव्ह बोर्डस गिरवणारा अन आजरोजी शाळेतल्या भिंतींना सजीव करणारा आहे परिचित आम्हाला तो चित्रकार,
आज शाळा मास्तर च्या रोल मध्ये शिक्षण सेवेच्या माध्यमातून मुलांच्या फ्रेश ब्रेन्स मध्ये अशी चित्रे रंगवून तुम्ही देताय त्यांच्या अवघ्या आयुष्याला आकार!

आपल्या नृत्याभिनयाने लोकांना भूरळ घातली नसावी तर नवल या कलाकाराने,
आजही आठवतेय आम्हाला तुमचे अजिंक्य च्या बुगी उगीत सादर केलेले चत्तूरणार वाले गाने!

नाचणारे ते गुरुजी अर्थातच गातातही छान,
महंमद अजीज सारख्या उंच्या पठडीतल्या आवाजाचे दिवाने यांना तालासुरांची आहे उत्तम जाण!

समर्थ विचारांचे आचरण करणारे गुरुजी यांचा बेसही असे सॉलिड पक्का जेव्हा जाती हे अध्यात्माच्या गावात,
काडीचं व्यसन नसलेला शुद्ध शाकाहारी माणूस जरी असला याच्या वाघ आडनावात!

पाटणचे जावई हे आपल्या महाडच्या साडुंना घेऊन पार काश्मीर पर्यंत जाऊन आलेत,
आपल्या सहलींच्या चोख नियोजनाने आत्ताच यांनी गोव्याचे खारे बीचेसही गोड केलेत!

तुमच्या आजघडीच्या व्हॉलीबॉल स्टफ वर मात्र फारसं काही बोलत नाही,
कारण असे ऐकायला मिळतेय की तुम्ही त्या व्हॉलीबॉल च्या पायात लोकांचे फोन उचलत नाही!

असे हे बहुरंगी गुणांनी नटलेले बहुआयामी बहारदार व्यक्तीमत्व श्री_सचिनसर_वागडोळे गुरुजी उर्फ बापू यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!! 

With love & regards

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...