Close

Sandip Gambhir

नावाच्या पूर्वार्धात 'सन' अन 'दिप' उत्तरार्धात
सहस्रों दिव्यांचा प्रकाश, त्या सूर्याचं तेज झळकतं तुझ्या व्यक्तिमत्वात!

गोरापान वर्ण अन रेखीव बांध्याचं मदनासम तूझं रूप,
शांत निर्मळ स्वभाव असा जणू कुणी आळवावा पहाटे भूप!

जात्याच लावलेय तूझ्या त्या तल्लख बुद्धीला धार,
हरएक गोष्टीचा चिकित्सक वृत्तीने केलेला अभ्यास तुझा फार!

पदवी तुझी इलेक्ट्रिकल अन जरी तू व्यवसायाने अभियंता,
असेल का उरला प्रांत ज्याला शिवली नसेल तुझी बुद्धिमत्ता!

जीज्ञासेला बौद्धिक सामर्थ्याची जोड देऊन केलेलं तुझं अभ्यासू सर्वांगिक लेखन,
आज सोदाहरणाने विस्तृतपणे मांडतं अनुभवांतून आलेलं शहाणपण!

मग संगीत असो वा विषय क्रीडेचा, देश असो वा फड राजकारणाचा,
प्रत्येक क्षेत्राला न्याय देणारा मुरब्बी लेखक तू हाडाचा!

टिसीसीच्या ज्या संदीपचे ऑलराऊंड क्रिकेट करायचे ग्राऊंडवर कमाल,
त्याचं संदीपची लेखणी घेऊन केलेली लेखनक्षेत्रातली ब्याटींगही आज फुल करते धमाल!

शुद्ध वाणी, प्रसन्न हास्य, निर्मळ स्वभाव, तल्लख चौकस बुद्धी अशा विविध बाबींनी समृद्ध असलेले तारळे अन तारळे वासीयांवर निस्सीम प्रेम करणारे, उंडाळेंची पुरी भाजी तारळ्याला येईल तेव्हा न चुकता चवीने खाणारे, आपल्या टॉप क्लास ब्याटींग अन बॉलिंग ने अखंड पंचक्रोशीत नाव कमावलेले आजघडीचे लेखक, दि ग्रेट ह्यूमन बियिंग श्री संदीपसर_गंभीर यांना वाढदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!! परमेश्वर आपल्या सर्व इच्छाआकांक्षांची पुर्ती करत आपले व्यक्तिमत्व असेच झळाळत ठेवो हीच सदिच्छा!! 

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...