सातारा पंचक्रोशीत हिट असलेल्या कॉम्प्युटर वर्ल्ड चे मालक,
जी. के. सोल्युशन्स मधले जी फॉर गुजर आडनावधारक!!
कितीही कठीण परिस्थिती असेल तरी शांत राहून निर्णय घेण्याची खासियत यांच्या ठायी!!
एकदा माणूस यांच्या मनात बसला कि कायम स्वरूपी तो तिथेच राही!!
सर्वार्थाने बाप माणूस हा टेक्निकल दुनियेतला,
तेवढाच चांगलाय याच्या बुद्धीचा सेन्स व्यापार क्षेत्रातला!!
एकेकाळी होता हा खमक्या ऑलराउंडर थंगड क्रिकेटचा,
नंतर काय लहर आली काय माहित, क्रिकेट सोडून याने रस्ता धरला बॅडमिंटन कोर्टचा!!
निवांत खेळने आणि शेवटच्या बॉल ला टिचुक करून रन काढणे ही असायची स्टाईल याची,
बॅडमिंटन खेळताना असली टिचुकवाली स्टाईल नक्कीच पडत असनार कामाची!!
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सेल सुरु करून कॅण्डी क्रश हॅरी खेळणार,
आत्तापर्यंत दोन तीन वेळा आरामात पार केल्या असतील लेव्हल्स दोन एक हजार!!
दरवर्षी न चुकता आनंद ला घेऊन शेगाव अन तिरुपतीची क्विक भावुक ट्रिप हा करतो,
यावर्षी मात्र सलाईनची बॉटल हातात घेऊन अचानक राशियालाच काय जातो!!
हरीशेठ, शुभेच्छा देऊन खूप इच्छा होतेय मला तुम्हाला पार्टी मागायची,
पण उलटे म्हैसूर मधल्या रम्मीचे माझेच एक जेवण देणे ड्यू आहे मला आठवण होतेय याची!!
असो, शांत, संयमी, निश्चल, निःष्कपट, धडधाकट श्री हरीशेठ गुजर उर्फ हॅरी तुम्हाला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
या वाढवर्षात तुम्ही शेकडो कॉम्प्युटर्स, हजारो सीसीटीव्ही विकून लाक्खो रुपये कमवा हीच डी फॉर Darshan ची सदिच्छा!!
-D for Darshan