Close

Ashish Ganapule - The Birthday Boy

आशिष सर,
तुम्ही मस्त असाल अधिकारी वर्ग एकचे,

वा असाल तज्ज्ञ प्रगत शेतीचे!

भले चालू असो तुमचे आकाशवाणी वरून वारंवार मार्गदर्शन,
वा सतत चालो तुमचं बाळासाहेबांबरोबर व्याख्यांनाच पारायण!

असे ना का तुम्ही उत्तम निवेदक हजरजबाबी विनोदबुद्धीचे,
वा असो आम्हा सवंगड्यांचे मॅनेजर कडक शिस्तीचे!

तुमच्या या सर्व गुणांचा आदर करून आम्ही मात्र तुम्हाला फक्त अन फक्त पट्टीचे गायक म्हणूनच ओळखत राहणार आणि शुभेच्छाही तुमच्यातल्या त्या गायकालाच देणार!

तोच चंद्रमा नभात सारख एखाद बाबूजींचं भावगीत असो वा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा सारखा भीमसेनजींचा अभंग असो, पराधीन आहे जगती सारख गीतरामायणातील गीत असो किंवा मनाच्या धुंदीत लहरीत येना सारख हलकफूलक उडत्या चालीच गाणं असो,

अशी कित्येक मूळ गाणी ऐकताना "अरे! हा गणपुले सरांचा तर आवाज नाही ना?" असा प्रश्न मनात येन हे सर तुमच्या गायकीच्या प्रगल्भतेची प्रचिती देऊन जातं!

आजतागायत संगीताचं कसलही सैद्धांतिक शिक्षण न घेता स्वतःलाच स्वतःचा गुरु मानून, वर्षानुवर्षे कंठ घोटवून केलेल्या रियाजाच्या तपस्येने स्वरांशी आपली घट्ट अशी मैत्री जमवून अन तालाला अंगभर भिनवुन दोहोंवर आपली अनन्य साधारण पकड मिळवलेल्या सुरसम्राट श्री आशिष गणपुले सर यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...