Close

Darshan Loya- The Birthday Boy

विक्रमी गतीने पूर्ण करतो जो एकवीस किलोमीटर सातारा हिल मॅरेथॉन दरवर्षी साताऱ्यात,

तीच गती राखतो हा आपल्या उद्योगधंद्याच्या सांभाळ अन विस्तारात!

मालक आहे जो साताऱ्याच्या सुप्रसिद्ध लोया परिवाराच्या सातारा डिस्ट्रिब्युटर्स उद्योगाचा,
जणू निरंतर वाहणारा झरा आहे जो एनर्जी अन उत्साहाचा !

सेम्स चा विद्यार्थी हा सातारा पॉलीटेकनिक मधून झाला होता फार्मासिस्ट,
असंख्य औषधांच्या एजन्सीजचा आज आहे हा स्टोकिस्ट !

आपल्या निजी उद्योगासोबतच आहे वस्ताद हा शेअर्सच्या मार्केटचा,
त्यायोगे असेल भागीदार हा कित्येक नामांकित कंपन्यांचा !

स्वतःला फिट ठेवायला हा सकाळच्या प्रहरी नियमितपणे धावतो,
जर धावत नसेल तर हा बॅडमिंटन कोर्टवर शटल टिपताना घावतो !

मिळवतो हा सर्वांची वाह वाह जेव्हा खेळी दांडिया वा गरबा ,
असे हा महत्वाचा धागा, जेव्हा उत्सव असे गणपती वा दुर्गा !

करी हा उत्स्फूर्त नियोजन समाजाच्या रक्तदाना सारख्या श्रेष्ठ दानाचे,
कुशल नेतृत्व करतो हा सातारा माहेश्वरी समाजाच्या आरोग्य विभागाचे !

विधविविध प्रकारचे डिझायनर शर्टस घालने हा याचा छंद आहे,
लोया घराणे एवं समाजाचा हा मस्त कलंदर आहे!

ज्याने आजच पूर्ण केलय हंड्रेड डेज च्यालेंज तब्बल सलग शंभर दिवस धाऊन,
आपल्या जन्मदिनी स्वतःला द्यायला दुसरे चांगले गिफ्ट ते काय असेल याहून?

असंख्य गुणांनी नटलेले, सामाजिक बांधिलकी असलेले, खिलाडूवृत्तीच्या हसतमुख चेहऱ्याचे व्यक्तिमत्व लाभलेले, प्रगतिशील व्यावसायिक आमचे परम मित्र श्रीयुत दर्शनजी लोया यांना जागतिक मित्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर आलेल्या त्यांच्या प्रकटदिनाच्या त्यांचे परम #मित्र दर्शन एवं समस्त मित्र मंडळ यांचेकडून कडकडून मिठी मारून अब्जावधी शुभेच्छा !!

Congrats a ton dear Darshan for setting up that another record by completing hundred days run challenge on an occasion of this special day itself too!! Kudos!!!

 

-D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...