Close

Prashant Kodule - The Birthday Boy(14Dec2018)

उत्कृष्ट संघटक, खेळाडू, रसिक, हरहुन्नरी, हजरजबाबी, विनोदी अशा विविधरंगी अष्टपैलू व्यक्तिमत्वाने संपन्न असलेल्या

खुशमिजाज, हसतमुख अशा श्री प्रशांतशेठ कोडुले नामक सळसळत्या उत्साहाने खळखळून वाहणाऱ्या झऱ्यास वाढदिनाच्या अरबो खराबो शुभेच्छा! 

( With all due respect to Sulochana Tai's epic Fad sambhal turyala g aala song! )

पार्टी दे तुझा बडे र आला
नाहीतर पश्या तुझ्या उसाला लागलं कोल्हा! ?

लही हुशारीन करतो तू शेती
खोलत खोलत बँकेची खाती
लही गॉड तुला गावाची माती
तुला हरएक माणूस माणिकमोती
चालती बोलती तू बँकेची शाखा
डिजिटल इंडियाचा तू पाठीराखा
समद्या भागात तुझा बोलबाला
पशा तुझ्या उसाला लागल कोल्हा! 

तुझ्या रक्तात भिनलय किर्केट
बॉल दिसुस्तुर जातीया इकेट
आर फेकशील बॉल किती?
आपली आपण धरावी भीती
लही फेमस तुझा आडवापट्टा
थ्रो करतो का करी तू थट्टा?
तुझ्या अंगात नाना कला
पशा तुझ्या उसाला लागल कोल्हा! 

तू दिसतोस तरानाबांड
खोड्या करिसी तू वाण्ड वाण्ड
लही चावट तुझी इनोदबुद्धी
तुला सुचतं सगळ्यांच्या आद्धी
आर फोटो काढशील किती
तुझं स्वतःवर प्रेमच अती!
जणू देवच आम्हाला पावला,
तुझ्यासारखा अवली रे घावला
चल पार्टी दे तुझा बडे र आला
पश्या तुझ्या उसाला लागलं कोल्हा!! 

पार्टी_दे तुझा बडे र आला
नाहीतर पश्या तुझ्या उसाला लागलं कोल्हा! 

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...