Close

Pushkaraj Awad - The Birthday Boy 27 October 2018

पुष्कर शेठ, हॅप्पी बड्डे टू यू भावा,
मग कसाय आमच्या गरवारेचा राजबिंडी छावा?

अजूनही चालूये का शेठ तुमचं ते तासंतास जिम मध्ये घाम गाळणं,
बलदंड बायसेप्स अन सिक्स प्याक्स च्या मेंटेनन्स साठी रीतसर डाएट वगैरे फॉलो करणं?

काढता का अजून तुमच्या लांब लांबड्या लेन्स तुमच्या डीएसएलआर ला जोडायला,
जागवता का अजून रात्री त्या चांदण्यांचा मिल्कीवे वाला शॉट घ्यायला?

पाहिले आम्ही मध्यंतरी तुमचे फोटो पार त्या हिमालयातल्या लडाखचे,
बायकोमुळे मोजकेच काढायला मिळालेले दिसताहेत तरी तेही आहेत नमुने तुमच्या प्रगतीचे!

जातो का अजून फुल्ल सूट बूट घालून ते ट्रेकिंग वगैरे करायला?
नसशील ऐकत अजूनही तू ते डोंगर झपाझप चढायला!

पाहतोय तुझ्या स्टेटस वर तू सुट्टी मिळाली की अजूनही फुल गेमबीम खेळतो,
मला वाटत होते कोड्सचा फुल्ल ढीग लावून तू स्वतःला टीसीएसचा गीक म्हणून मिरवतो!

कोड वरून आठवल मला आपण सोबत केलेला तो आयपीएल फ्यानटसी वाला प्रोजेक्ट,
साला थोडासा बिझनेस सेन्स असता तेव्हा तर आत्तापर्यंत खाऊन टाकलं असतं त्याने पूरं मार्केट!

संपवतो का रे पातेलेच्या पातेले बिर्यानीचे आजही त्याच ताकदीने?
अजूनही विसरलो नाही त्या आयपीएल मॅचच्या जेवणा दिवशीची चव जे बनविले होते आईने!

तुला ते तुमच्या सोफ्यावर दिवस दिवसभर अभ्यासाला नसेल रे बसायला लागत आता कॉलेज सारखं,
फुल अभ्यास करून काहीच अभ्यास झाला नाही म्हणायची झाली का बंद तुझी ती चलनी नाटकं?

काय मजा यायची तुमच्या सहकारनगर वाल्या घरा बाहेर उभं राहून तासंतास फुल्ल गप्पा मारायला,
बच्चनचे 'मर्द को दर्द नहीं होता' सारखे डायलॉग्ज अन सुनील शेट्टीची मिमिक्री तुझ्या तोंडून ऐकायला!

म्हणतो का तू अजूनही ती गाणी मोठमोठ्याने बाईक चालवताना,
का तुझी फोर व्हीलर सवड देत नाही तुला आता फारशी टू व्हीलर चालवायला?

पुसटसं आठवतंय मला तुला 'जो जिता वही सिकंदर' लही आवडायचा,
त्यातलं 'गजब का है दिन' तू फुल्ल रोमँटिक सुर लाऊन गायचा!

डावखुऱ्या हाताने जयसूर्या सारखी बॅटिंग करणारा तू अक्रम सारखी यॉर्कर लेन्थ बॉलिंग करायचा,
करोडो लोकांसारखच साहेबांवर जीवापाड प्रेमही करायचा!

साहेबांनी रिटायरमेंट घेतल्यापासून क्रिकेट लहीच सूनं सूनं वाटायला लागलंय
दहा हजारी मनसबदार झालेल्या कोहलीनं सेंचुरीलाच चिल्लर बनवून टाकलंय!

साहेबांनी शंभर केल्या की तो दिवस आपल्यासाठी एखाद्या सणा पेक्षा कमी नसायचा,
फुल्ल क्वांटिटीत शंभर मारत असला तरी का कोणास ठाऊक कंटाळाच येतो मला कोहलीला पाहायचा!

अर्रर्र वाढदिवस राहिला बाजूला अन विषय भलतीकडेच निघाला,
शेठ, बघा तुमच्याशी बोलताना भान राहात नाही तुमच्या दोस्ताला!

वाढदिवसाच्या अरबो खरबो शुभेच्छा राजे!! तुम जीओ हजारो साल जीसमे एक ही साल आये बार बार!


 
- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...