Close

Ramanji Bhattad - The Birthday Boy

MBBS पदवी संपादन करून जवळपास गेली चार दशके वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सातारावासीयांना रुग्ण सेवा

पुरविणारे नामांकित डॉक्टर हे भट्टड घराण्याचे,

प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकल वैज्ञानिक संदर्भ घेऊन व्यावहारिक विचार करणारे प्रदीर्घ अनुभवी व्यक्तिमत्व यांचे स्वतःच्या स्वतंत्र विचारांचे!

न्यूज पाहताना बातमीसोबत स्वतःची रनिंग कॉमेंटरी करणारे आहेत हे मीडिया चॅनेल्स लव्हर,
जुन्या गाण्यांवर ठेका धरत आपल्या जमान्यातील किस्यांनी प्रत्येक गाणे करतात ते कव्हर!

अमावस्या, पौर्णिमा, मुहूर्त, पत्रिका वगैरे यांना बिलकुल पटत नाही,
वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभ्यासू विचारांना फॉलो करणारे डॉक्टर हे, यांना आपण ठरवू ती पूर्व दिशा राही!

खाण्यापिण्याची व्यवस्थित हौस करणार, बागकामात रमणार, गरजुंना आवर्जून मदत हे करणार,
अंधश्रद्धा निर्मूलनाचे समर्थक हे काळ्याला काळे अन पांढऱ्याला पांढरेच म्हणणार!

'काय समझला' असा प्रतिप्रश्न करून आपले म्हणणे ऐकणाऱ्याला व्यवस्थित समजले आहे का हे समजून घेण्याची स्टाईल यांची,
'मी काय म्हनलं' म्हणून आपला मुद्दा सोदाहरणाने व्यवस्थित पटवून द्यायची हटके कला त्यांची!

ट्रेनच्या प्रवासात डब्यात येणारा प्रत्येक आयटम टेस्ट करणार अन बरोबरच्यांनाही खाऊ घालणार,
सहप्रवासी कोणीही असो, हमखास यांचे त्यांच्याशी कुठून ना कुठून तरी लागेबांधे नक्की निघणार!

ज्या खानदानाचा मी जावई आहे आहे त्याच न्याती परिवाराच्या सिनियर पिढीचे आजच्या घडीलाही पंधरा पंधरा दिवस सासरवाडीत आपला ठिय्या मांडून ऐश करणारे हे पॉश जावई,
यांच्याच कृपेने मला मिळाली मिताली सारखी सर्वगुणसंपन्न अशी सुंदर लुगाई!

मोहीत रोहीत या गोऱ्यापान रुबाबदार जोडगोळीचे आहेत हे पप्पा,
निरन, अनेरी, अर्णव, निमिष या चिकन्या चौकडीचे लाडले ते दादा!

कडक लाडके सासरे लव्हली दीपा अन मोहिनी भाभींचे,
सौभाग्य रत्न हे आमुच्या लाडक्या रत्ना आत्याचे!

माझे आधी ओळखीने काकाजी होते नंतर झाले नात्याने ब्यायजी,
तुम्हाला तुमच्या जावयाकडून आलेल्या या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करा फुफाजी!!

आमचे कडक शिस्तीचे प्रेमळ स्वभावी आदरस्थान डॉक्टर श्री रमणजी भट्टड यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!

- शुभेच्छुक अन अशिर्वादोच्छुक
समस्त लाहोटी अन न्याती फॅमिली

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...