Close

Sachin Shete - The Birthday Boy

अरे सचिन सचिन आला तुझा वाढदिन 
निमित्त साधून उडालं तुझं फुकेट ला विमान

मावळ संगे घेऊन राजा तु करणार एन्जॉय तुफान 
नसला जरी इथं तरी नावे तुझ्या केक आम्ही कापणार
मेव्हणा विदेशात अन जल्लोष उंब्रजात होणार
निमित्त साधून उडालं तुझं फुकेट ला विमान! 

गोरागोमटा राजा असला जरी तु उंब्रजचा रहिवासी 
शेतकरी बागायतदार आहे नाळ जोडून चरेगावाशी 
कष्टाचं वैभव तुझं आज खातोय तुपाशी 
औषध विक्रीची सेवाबी करतोय कारण शिक्षण फार्मशी 
अशा मेव्हन्याचे पाहुणे आमच्या तारळ्याचे महाजन 
निमित्त साधून उडालं तुझं फुकेट ला विमान!

चालण्या बोलण्यातून वाटतं तुला आवडतं राजकारणं
छोट्या मोठया गोष्टी करून करिसी तू समाजहीकारण
दिंडीत जातो बैठक करतो तुझं संतासम आचरण
सिनेवर्ल्डचा चाहता होतो तू सिरियल्स मधेही रममाण
खाण्यापिण्याचा नाद तुला भावा तुझं नेटवर्कही तुफान
निमित्त साधून उडालं तुझं फुकेट ला विमान!

अरे सचिन सचिन आला तुझा वाढदिन 
निमित्त साधून उडालं तुझं फुकेट ला विमान 
तुझ्या जन्मदिवसाचं करतो मी अभिष्टचिंतन
हॅपी बद्डे टु यु भावा रिगार्डस डी फॉर दर्शन!

प्रकटदिनाच्या अरबो खरबो श्री सचिनशेठ शेटे साहेब!!

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...