Close

Shantanu Sadawarte- The Birthday Boy

अरे किती वर्षांचा झालास शंतनु?

तुझ्याबद्दल लेखक Anup सरांनी लिहिलच आहे, आता विचार

करतोय मी पुढं काय म्हणू

एक लेखक आणि दादूचा मित्र म्हणून मी अनुपचा आदर करतो,
मात्र त्याच्या लिखाणातील 'वाढदिवस तुझा अन उदोउदो दादूचा', या गोष्टीचा मात्र निषेध करतो!

कारण असा निषेध केला तरच मला काहीतरी पुढे लिहायला मिळेल,
आणि त्या लिखाणातून तुझ्यातला शंतनू नक्कीच खुलेल!

शंतनू, जसा दोन भावांत तू लहान आहेस तसा मीही लहान आहे,
त्यामुळे एका लहान भावाच्या मानसिकतेची मला चांगलीच जाण आहे!

थोरल्याच्या प्रभावाखाली धाकला नेहमीच झाकोळला जातो,
बीचारा कितीही कर्तृत्ववान असला तरीही नजरेआडच रहातो!

शंतनू, अरे सगळे जाणून आहेत तू तुझ्या फॅट टू फिट प्रवासात घेतलेले अपार कष्ट,
किलोमीटरच्या किलोमीटर धावून तू लाक्खो कॅलरीज केल्या असतील नष्ट!

विसरू नकोस तुझ्या दादूप्रमाणेच तुही आहेस एक इंजिनियर,
एवढंच काय त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन तू आता होशील मॅनेजर!

तुझी न संपणारी बडबड आणि त्यातून होणारी विनोदांची लागवड सर्वपरिचित आहे,
तुझ्या शेजारी बसून ती दोन नाटके पाहताना मलाही त्याची चांगलीच प्रचिती आली आहे! ?

नटसम्राट पाहताना 'माझे बाबा अगदी असेच आहेत' हे तू पोटतिडकीने सांगत होतास,
'ते फक्त पित नाहीत' असा दुजोरा मात्र तू न विसरता देत होतास!

घरापासून दूर राहिल्यामुळे तू दादूच्याही एक दोन पावले पुढे आहेस,
तो तुझ्या आधी बाबा झाला म्हणून काय झाले, तू त्याच्या आधी आता काका आहेस!

दादू चार वडापाव एका वेळी खात असला तरी तू पाचही पचवू शकतो,
आपल्या शिंदेंचा ट्रिपल राईस तू तीन वेळा हानु शकतो!

मित्रा खाण्यापिण्याचा नाद तुझ्या कोणीच करणार नाही,
पण सध्या जरा डाएटचा इस्शु असल्याने आत्तातरी तू कोणाला नडणार नाही!

शंतनू, मागे मला तू आर्टीगा घ्यायचीये असं काहीतरी बोलला होतास,
तेव्हा मात्र तू तुझ्या स्कुटीलाच तुझी आर्टीगा समझुन मांडी घालून चालवत होतास!!

असो, तुझ्याबद्दल लिहायला अजूनही खूप आहे पण मी थांबतो,
तुला तुझ्या वाढदिवसाच्या थोड्या लेट पण थेट शुभेच्छा देऊन या पोस्ट चा शेवट करतो!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Shantanu !

 

-D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...