Close

Siddharaj Shete- The Birthday Boy

आपल्या जीविकेच्या माध्यमातून सातारा पंचक्रोशीतील तमाम अबालवृद्ध मर्दांची तहान शमविणारे

पण स्वतःला मात्र त्यापासून चार हात लांबच ठेवणारे साताऱ्यातील सुप्रसिद्ध शेटे चौकातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व हे सुप्रसिद्ध शेटे घराण्याचे,

तहानलेल्यांच्या बुध्या गुल करून त्यांना स्वतःचा विसर पाडण्यास भाग पाडून आत्मिक शांतीच्या एका वेगळ्याच मार्गावर आणून सोडणारे तहहयात मालक चौकातील गुलमर्ग दुकानाचे!

आपली सहा फुटी राजबिंडी बॉडी घेऊन समाजातील वेगवेगळ्या बॉडीनवर सक्रिय राहून मिरविणारे धडाडीचे कार्यकर्ते लिंगायत वाणी समाजाचे,

कधी तिथल्या तिथं टिचुक करून पळणारे तर कधी हातापायाचा कडकलक्ष्मीसारखा थयथयाट करून चेंडूवर कडक प्रहार करणारे चिकट फलंदाज आमच्या घमासान क्रिकेट क्लबचे !

खुद्द पवारसाहेबांच्याही एक पाऊल पुढे चालून बारा बाराच्या आधी एक दिवस अकराबाराला आपला वाढदिवस घेऊन येणारे चालू घडामोडींचे तोंडी समीक्षण करणारे प्रभावी विश्लेषक हे राजकारणाचे,

तीनचार पत्तीनच्या डावात अर्थकारणाची जबाबदारी हौसेने आपल्या खांद्यावर घेऊन तोंडघशी पडण्याची तयारी ठेवणारे विद्यार्थी हे एमबीए मार्केटिंग फायनान्सचे !

आपल्या भर तरुणाईत आपल्या स्प्लेंडर वरून फिरत डिजी कॉलेजचा रोमिओ बनून एक काळ गाजवला यांनी,
आज वयाच्या पस्तिशीत प्रवेश करताना अद्ययावत टेक्नॉलॉजीचा लाभ घेत आपल्या केशसंभाराचे पुनर्वसन करून स्वतःसाठी पुन्हा तोच काळ आज जगवलाय शेठनी !

यानिमित्ताने सिद्धूशेठ, या वाढवर्षापासून,

पुन्हा फिरणार हात त्या केसांतून
पुन्हा बसणार फुंक त्या जुल्फेन्ना
खिशात राहणार कायम कंगवा
वळण द्याया त्या काळ्या गर्द जटांना!

पडणार भुरळ त्या केसाळ राजबिंड्या रूपाची
गलका होणार शेटे चौकात येणाजाणाऱ्या ललनांचा
कारण लावलाय विग आमच्या सिद्धूशेठनी
आता काळ्याभोर घनदाट केसांचा!

पस्तिशीतही सिद्धराज घेणार तो फील
वीस वर्षाच्या तरण्याबांड कोवळ्या पोरांचा
अवघ्या पंधरा हजाराच्या अल्प खर्चात
भरून काढलाय शेठ ने फरक पंधरा वर्षांचा!

छोटी मोठी गोष्ट नाही सिद्धूशेठ
हा दिवस आहे आनंदोत्सवाचा
हातावर पाणी घालून लेकरांच्या
करा स्वीकार होणारा वर्षाव या वाढदिनाच्या शुभेच्छांचा
हातावर पाणी घालून लेकरांच्या
करा स्वीकार होणारा वर्षाव या वाढदिनाच्या शुभेच्छांचा!

होठांच्या किंचित खालपर्यंत मिशा ठेऊन ऐटीत वावरणारे किल्ला ग्रुप चे ऐटदार व्यक्तिमत्व, आपल्या नावाप्रमाणे स्वतःला मित्रांच्या ह्रिदयांवर राज करणारा राजा म्हणून सिद्ध केलेले सिद्धराज_शेटे थोडक्यात सिद्धू यांना या अकराबाराच्या तेरा अरब शुभेच्छा!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...