ना निंदा कोणाची ना द्वेष करू
चला तो विठ्ठल जगून बघू!
कमी लेखू कोणा ना हीन म्हणू
चला तो विठ्ठल जगून बघू!
गरजवंता कर पुढे करू
चला तो विठ्ठल जगून बघू!
संत जनांचा संग धरू
चला तो विठ्ठल जगून बघू!
हरिनामाचे स्मरण करू,
चला तो विठ्ठल जगून बघू!
पुरुषार्थाने कर्तृत्व करू
चला तो विठ्ठल जगून बघू!
सढळ हस्ते दातृत्व करू
चला तो विठ्ठल जगून बघू!
चराचरी सुखानंद स्मरु
चला तो विठ्ठल जगून बघू!
- D For Darshan