टाळ मृदुंगाचा गजर! करत जयघोषाचा कहर!
निघाली आषाढी वारी! चला रायाच्या पंढरी!!
विराजीत ज्ञानेश्वरं! संत तुकोबा सहचरं!
पहा आले पुण्यनगरी! चला रायाच्या पंढरी!!
लोटला जणसागरं! लाखों नारी अन नरं!
चालले हरीच्या द्वारी! चला रायाच्या पंढरी!!
भावभक्तीचा मनी! ओढ विठुची घेऊनी!
विठ्ठल जगत चराचरी! चला रायाच्या पंढरी!!
निघाली आषाढी वारी! चला रायाच्या पंढरी!!
निघाली आषाढी वारी! चला रायाच्या पंढरी!!
- D For Darshan