Close

दमलेल्या बाबाची कहानी हिंदी

SSSS हाय नि हाय नखरा तेरा नि
हाई रेटेड गबरू नु मारे

हाय नि मुडे पागल हो गए ने
तेरे गिन गिन लक्क दे हुलारे SSSS

मंगळवारी बरोब्बर ५ वाजून ५५ मिनिटांच्या मुहूर्तावर माझ्या सेल ची रिंग खणखणली, हाती असलेल्या कॉफीच्या कप चा शेवटचा सिप घेऊन कप डेस्कवर ठेवत मी माझा आय-फोन क्स चा मनाला फील देणारा ब्लॅक नोट फाईव्ह प्रो रिसिव्ह केला,

"हॅलो दर्शन, राजू बोलतोय, थोडा वेळ आहे का?", मी काही बोलायच्या आधीच सातारा ड्रग हाऊस चे मालक राजुशेठ यांचा स्वच्छ गोड आवाज कानी पडला.

"राजुशेठ, प्रजेला राजासाठी वेळ नसेल असे कसे होईल? बोला ना शेठ, कशी आठवण केली?", मी प्रश्न केला.

"अरे काही नाही, थोडा त्रास द्यायचा होता तुला", राजुशेठ निरागसपणे बोलले.

"हाहा शेठ, कविता वगैरे लिहायला लावताय का?", मी हसत हसत गमतीने विचारले.

"अरे नाही रे! इथे माझ्या आयुष्याची कविता होऊन बसलेय, तुला कविता कसली लिहायला सांगतोय. पण ऐक, तसलंच काहीसं आहे.", राजुशेठ काहीशा खोल गेलेल्या आवाजात बोलले.

"हाहा, बरं बोल काय म्हणतो?", मी मेंदूला विनोदांग शांत करून श्रवणांग सुरु करण्याची सूचना देऊन विषयावर येण्यास तयार झालो.

"अरे काय झालय राधिका ने हर्षिता ला सोबत घेऊन परवाच्या अवॉर्ड्स कॉम्पिटीशन साठी एका मराठी गाण्यावर डान्स बसवला आहे. परवा तिला प्रेझेंट करायचा आहे आणि आज तिला समजलंय की निवडलेले गाणे फक्त हिंदी किंवा मारवाडी भाषेतलेच असले पाहिजे, मराठी चालणार नाही त्या राऊंड साठी. आता पूर्ण गाणे बदलून त्यावर पुन्हा ऍक्ट सेट करणे अशक्यच आहे. त्यात ती एकटी असती तर तिने कसही केलं असतं रे, पण हर्षिता सोबत असल्यामुळे ते शक्यच होणार नाही.", राजू बोलत होता.

"ओ अच्छा, मग.. ", मी बोलून लक्षपूर्वक ऐकत असल्याचे त्याच्या लक्षात आणून दिले.

".. आता जेव्हापासून ते गाणे चालणार नाही असे राधिकाला कळले आहे तेव्हापासून ती खूप डिस्टर्ब झालीये. एवढी तयारी करून ऐनवेळी गाणेच चालणार नाही म्हटल्यावर एवढे सगळे घेतलेले कष्ट पाण्यातच रे. आणि तुला माहीतच आहे, या लेडीज कोणतीही गोष्ट किती डेडिकेशन देऊन करतात ते. आपल्यासारखे असतो तर आपण म्हणून मोकळे झालो असतो की चला बरे झाले त्रास वाचला म्हणून!... "

"हाहा हो रे, मी तेच म्हणणार होतो", मी सेंटी विषय सुरु असतानाही राजुला सुचलेल्या विनोदबुद्धीला दुजोरा दिला.

".. पण या बायकांचं तसं नसतं रे. अशावेळी त्या एकट्या नसतात, त्यांच्या बरोबर त्यांच्या खास मैत्रिणी ही सोबत असतात. " , राजू पुढे बोलला.

"म्हणजे त्या कोण?", मी चिकित्सेने विचारले.

"आपल्या गंगा जमूनाच की आणि कोण! दुपारपासून ती रडतेच आहे. हर्षिता साठी खर तिला जास्त फील होतंय.", राजुचा आवाज अजून खोल झाल्यासारखा जाणवला. शेवटी तो ही राधिकाचा नवरा आणि हर्षीताचा बाबा होता.

थोडासा परिस्थितीचा अंदाज घेऊन मी सगळ्यात सोप्पा मार्ग मला सुचला तो सजेस्ट करायचा प्रयत्न केला,

"अरेरे, काही एवढं वाईट वाटून घेऊ नका म्हणायचं, आपणच आपल्यासाठी केलेला कार्यक्रम आहे हा, थोडीच एखाद्या ठराविक लेव्हल ची स्पर्धा आहे. चालवून घ्या म्हणायचं ना एखादं मराठी गाणं आयोजकांना आता काही पर्यायच नाही तर. "

"अरे दर्शन, सगळे सांगून झाले आहे. संयोजकांचेही बरोबर आहे. त्यांनी पहिल्या मीटिंग मधेच हि गोष्ट क्लीअर केली होती कि त्या राऊंड मध्ये फक्त हिंदी किंवा मारवाडी गाणीच चालतील म्हणून. त्या पहिल्या मिटिंग ला राधिका नव्हती त्यामुळे तिला ते माहीतच नव्हतं.", राजुने माझ्या शंकेचं निरसन केलं.

"ओह, असं लफडं आहे तर, मग आता काय करायचं काय?", मी विचारलं.

"हां त्याच साठी तर तुला फोन केलाय. राधिका म्हणाली ते गाणे आपण हिंदी मध्ये डब करून रेकॉर्ड करून घेतले तर प्रश्नच मिटून जाईल. तिने मला असं म्हणल्याबरोबर फक्त तुझच नाव समोर दिसलं. असलं काही करायचं म्हटलं तर आपला एकच माणूस आहे तो म्हणजे डी फॉर दर्शन असं तिला सांगून पहिला तुला फोन लावला. आता मला तर त्यातलं काही कळत नाही, काय वाटतं तुला? एका दिवसात एवढं सगळं होऊ शकतय का?", राजुने कमालीच्या उत्साहाने विचारलं.

राजुचं हे बोलणं ऐकून माझ्या मनामध्ये संमिश्र फीलिंग्ज आल्या. एक तर राजुला असं काही करायला माझी आठवण झाली हे ऐकून अभिमानाने उर भरून आला आणि त्याचवेळी असं आख्ख गाणं एका दिवसात तयार करून ते गायचं आहे याची कल्पना करताना राजुने धपकन शिवधनुष्यच हाती दिल्याचा फीलही आला.

"गायचा काही विषय नाही पण पूर्ण गाणे हिंदीत लिहायचं म्हणजे अवघड वाटतंय रे, त्यापेक्षा आयोजक लवकर तयार होतील जरा अजून प्रयत्न केला तर. मी सांगून बघू का त्यांना?", मी त्याच संमिश्र मनःस्थिती मध्ये राजुला विचारले.

"थांब, मी एक काम करतो. राधिकाला तुझा नंबर देतो, तीच बोलेल तुझ्याशी. सॉरी बर का शेठ, त्रास देतोय तुम्हाला...", राजू बोलला.

"त्रास वगैरे काही नाही रे, ठीक आहे, बोलून तरी घेतो भाभिंशी, पाहू मग काय होतंय ते. गाणे तरी कोणते आहे बाय द वे?", मला अचानक गाण्याची आठवण होऊन मी राजुला माझा शेवटचा प्रश्न केला.

"दमलेल्या बाबाची कहाणी", राजू उत्तरला आणि दोघांचे सेल बंद होऊन संभाषण थांबले.

विचार करत करतच ऑफिस चेअर वरती येऊन बसलो आणि एका टॅब मध्ये सलील सरांच्या या एव्हरग्रीन गाण्याचे लिरिक्स ओपन केले. प्रयत्न करायला काय जातंय म्हणून मराठी ओळी गुणगुणत हिंदी-मारवाडीत लिहायला सुरुवात केली,

मुरझाके सोइ हुई इक परी राणी
चेहरो है नम आंखियों में पानी
रोज का ही खेल है ये आज का ही नही
कैसे मांगु छोरी बोल माफी मै तेरी
निंदिया मै लल्ला तुझे गोदी में लेलू
सपनो में सही हंसी तुझे देदू
सुनेगी क्या बोल ओ मेरी लल्ला
थका हुआ ड्याडा री कहाणी भला !

अन आश्चर्य म्हणजे पाहता पाहता असे एक कडवे लिहूनही झाले! आत्मविश्वास यायला अजून काय हवय? तेवढ्यात पुन्हा रिंग वाजली,

SSSS हाय नि हाय नखरा तेरा नि
हाई रेटेड गबरू नु मारे SSSS

"हां भैय्या, राधिका बात कर रही हूँ! तीन मिनिट का ट्रॅक है भैय्या, होगा क्या पॉसीबल आप को वो गाना डब और रेकॉर्ड करना इतने कम समय मे? एक्सट्रीमली सॉरी भैय्या आप को बेवजाह तकलीफ दे रहे है पर... " , भाभिंनि पुन्हा सगळी हकीकत त्यांच्या एन्ड ने सांगितली. शेवटी त्या म्हणाल्या,

"भैय्या, रेकॉर्डिंग वाले संतोष सर ने साडे सात बजे तक गाना लीख के तैय्यार रखने के लिये बोला है.."

मी शांतपणे सगळे ऐकून घेतले. एक कडवे ऑलरेडी लिहून झालेच होते आणि पुढच्या पाऊण तासात फक्त दोन कडवी लिहायची आहेत हा विचार करून त्यांना बिनधास्त राहायला सांगितले.

संभाषण संपवुन पुन्हा राहिलेलं गाणं लिहायला घेतलं आणि ७. २० च्या आसपास कामचलाऊ गाणे लिहून झालेही! ते असे,

मुरझाके सोइ हुई परी जैसी राणी
चेहरो है नम ओरु आँखिया में पानी
रोज को हि खेल है ये आज को ही नही
किसा मुंडा मांगु छोरी माफी मै थारी
निंदिया मै लल्ला तुझे गोदी में लेलू
सपनो में सही मैं लाड थने करू
सुनेगी क्या बोल ओ मेरी लल्ला
थका हुआ ड्याडा री कहाणी भला!

इत्ताबडा सेहरमे में भीड थी भारी
पसीने से लथ ड्याडा करे लोकल सवारी
दिनुगारा रोज ड्याडा जावताना बोले
कहाणी कलवाली हम फिरसे हैं भुले
आ हि नही सका मै कल फिरभी रे
आज बेटा आऊंगा मै टाइम माते घरे
दुनिया में सैर करा पाचे सपनारी
रिअलवाली फैरी वास्ते स्टोरी वाली फैरी
बनाऊंगा थके हुए हाथों का झुला
थका हुआ ड्याडा री कहाणी भला !

फस गयो हूँ बेटा काम कर कर
फस गयो हूँ बेटा काम कर कर
लंबा सुच देखू थने जी भरकर
ईशो किशो ड्याडा गॉड टाबराने देवे
बेगो बारे जावे ओरु उशिरासु आवे
एक घर मे रेने भी मन मे है शोर
थारा थने ड्याडा नही मने म्हारी लोर
बचपन गयो थारो पुरो निसटर
रियो कई आबे थारा म्हारा खातर
थारा लाईफ मू ड्याडा गुमीला कई बोल?
बडापने ड्याडा याद आईला कई बोल?
सासराने जावताना उंबररा माते
ड्याडा वास्ते ढुळीला कई पानी गालामाते?
हुई थारी ड्याडा री कहाणी आटे !

दुसऱ्या दिवशी हेच स्वडब केलेले लिरिक्स संतोष सरांच्या स्टुडिओ मध्ये जाऊन रेकॉर्ड केले. या प्रयत्नातून तयार झालेल्या फ्रुट प्रॉडक्ट वर परवा राधिका भाभी आणि हर्षिता ने दमदार पर्फोमन्स हि दिला आणि प्रेक्षकांच्या अश्रूमिश्रित टाळ्याही जिंकल्या. Rajesh आणि भाभिंमुळे येऊ ठाकलेल्या संधीचे सोने झाले.

- D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...