Close

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा....

Wish you all very happy Ganeshotsav!! Taking inspiration from this auspicious day

and of course joyous dozen of days all set to hit from here,I have written this quick song!! See if and how this appeals!! 

गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया!!

आले गजानन, गजर करूया, या भक्तीने मोरयाचा
चला लोकहो सुरु करुया, उत्सव गणपती, देवाचा!

कर्ता सुखाचा, हर्ता दुखाचा, आज बसविला घरात
मंगलमूर्ती, मंगल करण्या, आली आपुल्या जीवनात!

सोंड लांब अन मूषक वाहन, छबी अशी गणरायाची
गजराज आले आपुल्या दारी, देण्या शिकवण समभावाची!

लाऊन शेंदूर, पूजा करता, दुर्वा मूर्तीस चढवूया
झाडे लावून ती जगवुनी, दुर्वेचा आब राखुया!

प्रसाद मोदक लाडूचा, बाप्पाला आपण भरवूया
गरज पाहून, शोभा टाळून, अन्नाचा अपव्यय टाळूया!

सुरात आरती, विनायकाची, मनोभावे सारे करूया
समतोल ठेवुनी, तालबद्ध हे, जीवनगाणे गाऊया!

जितक्या लवकर आले लंबोदर, तितुक्या लवकर, जातील
उमेद भरुनी, जीवनी आपुल्या, नवऊर्जा मात्र भरतील!

आले गजानन, गजर करूया, या भक्तीने मोरयाचा
चला लोकहो सुरु करुया, उत्सव गणपती, देवाचा
चला लोकहो आपण करुया, उत्सव गणपती, बाप्पाचा
चला लोकहो आपण करुया, उत्सव मंगल मूर्तीचा!

मंगल मूर्ती मोरया!!!

 - D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...