Close

कालच्या एव्हीनिंगची गोष्ट....

कालच्या एव्हीनिंगची गोष्ट....
तसं काल सारबांकडून अचानक छोटीशी पार्टी मिळाल्याचं 

निमित्त झालं आणि हे गाणं माझ्याकडून रचलं गेलं, पण तसं पाहिलं तर सारंग साहेबांच्या अशा छोट्या मोठ्या पार्टीजचा, त्यांच्या स्वादिष्ट, चविष्ट रसोईचा आणि त्यांच्या कमालीच्या उत्साहाने खाऊ घालण्याचा त्यांच्या कितीतरी खादाड खाऊ मित्रांनी आजतागायत अनुभव घेतला असेल, घेत असतील! त्या सर्वांच्या वतीने सारंग सर, तुम्हाला ही छोटीशी पोहोच पावती....! 

( Of course daring to post this on social platform with all due respect to epic blissful song on Lord Shri Gurudatta, Nighalo gheun dattachi palakhi )

- D for Darshan

Lyrics for reference -

सारंगा सारंगा दिलदार मनाचा सारंगा

निघालो जेऊन वड्याची पारटी
आम्ही भाग्यवान तृप्त झालो छान
मिळाली सहज साऱ्याची पारटी
निघालो जेऊन वड्याची पारटी!
सारंगा सारंगा जाम खुश केलं सारंगा

आरती गणेशाची केली मंदिरात
लगोलगी पडले पुण्य पदरात
मिळाला प्रसाद जेवणा प्रहरी
निघालो जेऊन वड्याची पारटी!

सारंगा सारंगा उत्तम आचारी सारंगा

वाट वळणाची ती सारंगाची साद
दिसले समोर जेव्हा पोतदारांचे घर
डिश वाढली ती मटकी वड्याची
निघालो जेऊन वड्याची पारटी!

सारंगा सारंगा किती खाऊ घालशील सारंगा

उसळमटकीची चटणीची जोडी
दह्याची सोबत काकडी ती ओली
चव अफलातून मटनासारखी
निघालो जेऊन वड्याची पारटी!

सारंगा सारंगा दिलदार मनाचा सारंगा

DForDarshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...