Close

Sudhir Phadake - Babuji Aikave Te Babuji Smarave

"विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था"

परवाच्या 26 तारखेला, 29 जुलै 2002 रोजी कालवश होऊन अजरामर झालेले गायक व संगीतकार स्वर्गीय श्री सुधीरजी फडके उर्फ बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष संपन्न झाले. हजारो गाण्यांचा या ना त्या नात्याने भाग होऊन संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या आपल्या अमूल्य योगदानाने खासकरून मराठी संगीत साहित्याची श्रीमंती कैक पटीने वाढविणाऱ्या बाबूजींना दिवंगत होऊन पंधरावर वर्षे झाली खरी पण त्यांनी स्वरबद्ध केलेली गाणी ही शाश्वत आहेत अन शाश्वत राहतील!

योगायोगाने जुलै च्या या सव्हिस तारखेला बाबूजींच्या जन्मठिकाणी अर्थात कोल्हापूरला जाण्याचा योग आला. कोल्हापुरात अवतरलेल्या या महान मानवाच्या आठवणीत, त्यांच्याच जन्मभूमीवरून, यायोगे त्यांना समर्पित काहीतरी लिहावे म्हणून मन विचार करू लागले अन जे सुचले ते अंकित करून घेतले. लिहिलेल्या त्या पंक्तींना एखाद्या मोहक चालीमध्ये बसवून गाण्यासाठी ते लिखाण ज्याच्या योगे खऱ्या अर्थाने सुधीर फडकेंची, बाबूजींची सर्वप्रथम ओळख झाली त्या गणपुलेंच्या आशिष ला पाठविले. त्यानेही कमालीच्या उत्साह अन शिघ्रतेने आपल्या मध्यमा पर्यंत मजल मारलेल्या चिरंजीव ऋग्वेद ला हार्मोनियम च्या साथीला घेऊन, त्या लिखानास गोड यमनच्या सुमधुर चालीमध्ये बसवले. अशारितीने बाबूजींवरील प्रेमातून तयार झालेले हे 'एन्ड प्रॉडक्त', हे गीत, हा प्रयत्न, कमालीच्या अभिमानाने शेअर करताना विलक्षण आनंद होतोय!

ऐका, ऐकवा अन कसे वाटतेय हे आवर्जून सांगा!!

बाबूजी_ऐकावे_ते_बाबूजी_स्मरावे

अवतरले कोल्हापुरे, राम नावें
वामनरावांचे शिष्य, पुढे सुधीर झाले
बाबूजी म्हणोनी, श्रोत्यां हृदयी वसिलें
बाबूजी ऐकावे, ते बाबूजी स्मरावे!

गाजविली दशके पाच, संगीत सेवें
सहस्त्रावरी प्रयोगांतुन, दिले अमोल ठेवे
मोती सह्याद्रीचे, दुजे ना यांसम व्हावे
बाबूजी ऐकावे, ते बाबूजी स्मरावे!

अर्धसहस्त्र गीतांना, दिले यांनी स्वर
होती भाव-भक्ती होता, प्रेम शृंगार
गायन भासे जैसे सूर, जलावरी तरावे
बाबूजी ऐकावे, ते बाबूजी स्मरावे!

गदिमांसवे जोडीने, रचिला इतिहास
अतुल्य रचनांचे, गीतरामायण खास
शास्त्र संगीताचे, श्रवून पाढे गिरवावे
बाबूजी ऐकावे, ते बाबूजी स्मरावे!

इतिसमयी आयुष्याच्या, केला सावरकर
संघपुरस्कर्ते आण्णा, जनसेवेसही तत्पर
'जगाच्या पाठीवर', आवर्जून वाचावे
बाबूजी ऐकावे, ते बाबूजी स्मरावे!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...