Close

कालच्या दिवसातील ठळक घडामोडी # क्रिगेट_टुगेदर

कालच्या दिवसातील ठळक घडामोडी  क्रिगेट_टुगेदर

 वागडोळे गुरुजी आणि चेतन वकील यांनी पहाटे पाच

वाजता जाऊन ग्राउंड ची केलेली आखणी अन नागेंच्या साथीने केलेले मांडव साऊंड सिस्टीम चे चोख नियोजन,
विकी फडतरेंनी नेहमीच्याच तडफडीने तडक सकाळी साऱ्यांना फोन कॉल्स करून केले आंब्याखाली पाचारण!

सातारा उंब्रज करांचे तारळेकरांच्याही झाले अगदी वेळेत आगमन,
डॉक्टर बबन साळुंखेनी आपल्या स्टेडियम वरील सेमीफायनलचे कारण देऊन ऐनवेळी शेपूट घालून केले साताऱ्याला पलायन!

नंबर दोनच्या पेठेच्या आपल्या नेहमीच्या यूनिव्हर्सल इशू मुळे वरच्या पेठ करांनी केलेली दिरंगाई,
राजा कुंभार च्या दाढी अंघोळीच्या नादात धरमाला वाट पाहून वेळेत पोहचायला ऐनवेळी करावी लागली घाई!

थोडे मागे पुढे होऊन आठच्या दरम्यान जवळपास सगळ्या मावळ्यांनी भरून गेला सडा,
सुवर्ण येचजीएमटी आणि आदर्श नवयुग या दोन संघातील सामन्याने मग सुरु झाला क्रिकेटचा राडा!

संतोष कुंभार, धरमा लोहार यांनी बऱ्याच वर्षांनी "अचानक" खेळत असूनही केला तिखट इनस्वीगिंग मारा,
उमेश महाजन, मंगेश उंडाळे, गोपाल बारटक्के यांच्या "आदर्श" साथीने आशिष च्या संघाने चारला वागडोळे गुरुजींच्या "वरच्या" संघाला पराभवाचा चारा!

संतोषमाळी भैय्या ससाणे या मामा भांजेच्या जोडगोळीने केले तिन्ही क्षेत्रात खास प्रदर्शन,
बांबवडेचा हिटर रोहित ठरला फलंदाजीतले खास आकर्षण!

पुढच्या सामन्यात प्रशांत, बद्डे बॉय भैय्या च्या गोलंदाजीने केली रामभाउंच्या संघाची नाळ टाईट,
कैक वर्षाने बॉल हाती घेतलेल्या जाधवांच्या आबाने पहिल्याच तेजतर्रार चेंडूवर त्रिफळा उडवून त्यांची अवस्था केली अजून वाईट!

नंतर धावांची खैरात झाली जेव्हा वकिलसाहेबांनी केली सुरुवात टाकाया वाईड,
वकिलांच्या एका ओव्हर मध्ये वीस धावांच्या खैरातीमुळे पहाता पहाता सत्तरीत पोचली रामाची साईड!

आपल्या वकील मित्राची इज्जत राखाया दर्शनने कंबर कसली,
पंम्पू सॅनडीच्या साथीने एका बाजूने आठ ओव्हर नेटाने किल्ला लढवून दर्शाने संघासाठी विजयश्री खेचून आणली!

तेरा बॉल मध्ये सतरा धावांची गरज असताना रामभाऊंच्या जुसी फुलटॉस वर सॅंडीने छगी मारली
ऐनवेळी बसलेली ती छकडी आता आयुष्यभरासाठी रामभाऊंच्या काळजात घर करून राहिली !

नंतरच्या प्रदर्शनीय सामन्यात कंपॅरिटिव्हली फार कमी क्रिकेट खेळलेल्या टिलू निळुने अगदी स्टंपात मारा केला,
बॉलिंग कशी करायची असते याचा जणू धडाच त्यांनी आपल्या वाईड चा बादशाह ठरलेल्या वकील मित्राला दिला!

शेवटच्या ओव्हर मध्ये निकाल लागलेल्या दोन अटीतटीच्या सामन्यानंतर खेळ थोडासा पांगळला
जाधवांच्या बाबा सारखा ब्याटिंग साठी मग थोडाफार हावरापणा चालू झाला!

लेग साईडला ओढून चेंडू लांब भिरकावण्याच्या नादात कोडुलेंच्या प्रशांतने आत्महत्याच केली
स्वतःचे तीन स्टॅम्प पाडून झालेली त्याची हिट विकेट दिवसभरातले आकर्षण ठरली!

या वयातही फिट्टम फाट असलेल्या धर्मा लोहारने चक्क हॅट्ट्रिक ही घेतली
उंच उडालेला फटका सीमारेषेवर अलगद झेलून वागडोळे गुरुजींनी ती शक्य केली!

उमेश महाजन अन रियाज मनेरनी क्लोज क्षेत्ररक्षण करून फिल्डिंग मधेही चमक दाखवली
ब्याटिंग पाहण्यासाठी आसुसलेल्या संदीपच्या बॉलिंग आणि क्लोज किपींग ने पाहणाऱ्यांची मने जिंकली!

आभाळी उंच उडालेला झेल परवाच पन्नाशी गाठलेल्या दादांनी आबदार टिपला,
फलंदाजीतही एक चौकार ठोकून आपला दिवस सार्थकी लावला!

लक्षणीय संख्येने उपस्थित राहिलेल्या बांबवडे करांना तारळेकरानी खेळीमेळीने धूळ चाखली
भावड्या, रोहित, काकडे गुरुजींनी आपल्या अष्टपैलू खेळांतून मात्र आपली फिटनेस दाखवून दिली !

तीन सामन्यांची चोवीस आणि अम्पायरिंग ची सोळा अशी तब्बल चाळीस षटके आशिष ग्राउंड वर राहिला
ओसंडून वाहणारा त्याचा तो उत्साह त्याची खेळाप्रती आवड अन आत्मीयताच दाखवून गेला !

फडात कुस्तीची कॉमेंटरी करत असल्याच्या स्टाईल मध्ये वागडोळे गुरुजींनी समालोचन केले,
ग्राउंड वरच्या स्वतःच्या ऑफ अन ऑनलाईन प्रदर्शनाने आपण अजूनही बैल नसून चित्ताच असल्याचे सिद्ध केले!

इव्हेंट साठी अथक मेहनत घेतलेल्या चेतन सरांनी समालोचना बरोबर नियोजनाचीही जबाबदारी चोख पार पाडली,
श्वास न घेता भर भर कॉमेंटरी करत टीलूशेठ नीही आपली कॉमेंटरी करण्याची हौस करून घेतली !

वडा पाव, केळी अन ग्लुकोन डी सारख्या एनर्जी ड्रिंक्स नि टप्प्याटप्प्यावर खेळाडूंची एनर्जी कंसिस्टन्ट ठेवली,
योगेश पवेकरांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पवेकरांच्या स्वादिष्ट जेवणाने या ऐतिहासिक इव्हेन्ट ची गोड सांगता केली,
पुढच्या वर्षी कधी दिवाळी येतेय आणि कधी पुन्हा असं एकत्र येऊन खेळायला मिळतंय या एकाच विचारात साऱ्यांनी एक्झिट घेतली!!

 

-D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...