Close

Ashish Ganapule - The Birthday Boy

एकवीस मार्च उजाडता येई वाढदिवस जयाचा
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

अवतरले तारळ्यात हे रमेश-सवितेच्या घरी
बीज संस्कारांचे यांच्या गेले पेरले चराचरी
अभ्यासातही पुढे कोणी नाही नाद केला यांचा
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

वर्ण गोरागोमटा, रेखीव शरीरयष्टी यांची
जाडजूड मिशी शोभे जी शान आहे त्यांची
एकूणच भासे हा पुतळा मदनाचा
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

जन्मभूमी तारळे तर कराड कर्मनगर
भार्या गुणवान अनुष्का सुपुत्रे ऋग्वेद रुचिर 
कुटुंबवत्सल पुत्र स्वतः सर्वांवर जीव फार याचा 
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

विज्ञानशाखेचा अभ्यासक हा विद्यार्थी राहुरीचा 
घेऊनि ऍग्री ची पदवी झाला अधिकारी कृषीचा 
आज घेती लाभ बहू लोक याच्या मार्गदर्शनाचा 
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

घेतेलाभ आकाशवाणी याच्या ज्ञानसाधनेचा 
प्रसारित होत राहतो पाढा यांच्या मुलाखतींचा 
ऐकून वाढे उत्पन्न एकरी मिळे तोडगा किडीचा 
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

माणूस लहरी याला फिरावयाचा नाद 
मॅनेजर चोख हाच कोणी कितीही घालू दे वाद 
जयामुळे पर्याय मिळतो आम्हा पर्यटन स्थळांचा 
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

सदा जीवनी सदा याला गाणे प्रथम स्थानी 
आठवती बाबूजी जेव्हा गाते याची वाणी 
गाढा उपासक हा श्रीमंत सुरेल संगीताचा 
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

देतो शुभेच्छा आम्ही तुझ्या वाढदिना दिनी 
दुमदुमो कीर्ती तुझी अशीच बहरो तुझी गाणी 
मान वाढवी तू लोकीं आम्हा सवंगड्यांचा 
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

असेहे आमुचे गुरुवर्य, आशास्थान, स्फूर्तिस्थान, बलस्थान, एव्हरग्रीन, एव्हरफ्रेश श्री आशिषसर गणपुले यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!! 

With love & regards

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...