Close

गणेशोत्सवाच्या_हार्दिक_शुभेच्छा


With all due respect to evergreen song Jay Ganesh Jay Ganesh Deva, posting this attempt of creating,
  आलास बाप्पा तू आता आमच्या घरी रहाया!

जय गणेश जय गणेश जय गणेश राया
आलास बाप्पा तू आता आमुच्या घरी रहाया!

नैराश्याची मरगळ दूर तू करणार
चराचरी प्रसन्नतेचा शिडकाव होणार
लागली आस तव आता मंडपी पहाया
आलास बाप्पा तू आता आमुच्या घरी रहाया!

घरोघरी बाप्पा तुझी पुजार्चा होणार
मोरयाच्या नादाने सारे बाप्पामय होणार
करोनी आरती प्रसाद मोदकांचा खाया
आलास बाप्पा तू आता आमुच्या घरी रहाया

दर साल उत्सव तुझा जोमाने होतो
नगरीशहरी गावोगावी भक्तीसागर लोटतो
राष्ट्रीय एकोप्याची साऱ्या शिकवण द्याया
आलास बाप्पा तू आता आमुच्या घरी रहाया!

जय गणेश जय गणेश जय गणेश राया
आलास बाप्पा तू आता आमुच्या घरी रहाया!

- D For Darshan

मोरया!! 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...