Close

Prashant Navandhar - The Birthday Boy

प्रशांत शेठ,

तुमच्या नावात जरी असला शांत तरी आम्हाला आजतागायत तुमचा कुठलाच अँगल शांत नाही वाटला,
सगळ्या क्षेत्रात नुसता दंगा उसळून देणारा तुमचा हरएक वकुब जणू प्रदंगच भासला!

आत्तेभावाच्या नात्याने जेव्हापासून तुम्हाला ओळखतोय तेव्हापासूनचा इतिहास यायोगे मला आठवला,
काहीही म्हण पण आजच्या वेल सेट प्रोफेशनल व्यापाऱ्यापेक्षा तुझ्यातला लहानपणीचा तो शिळ्या मारणारा वाण्ड पशाच मला जास्त भावला!

तुझं ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मामाच्या गावाला येणं,
अन सतत या ना त्या कारणाने मामांच्या शिव्या खाणं!
कितीही शिव्या खाल्या तरी सगळ्या बालगोपाळांची जबाबदारी स्वतःच्या माथी घेणं,
अन तुझ्या मामाने खास माझ्यासाठी आणलेली चॉकलेट्स दरोडा घालून इतर सगळ्यांना वाटणं!
बाथरूमच्या पत्र्यावरून नारायण मंदिराच्या शिखरावर पैज लावून ती लांबच्या लांब उडी मारणं,
अन निरमाच्या पाण्याचे बुडबुडे करायचं रीतसर ट्रेनिंग देणं!
उंडाळेंच्या भक्कम दिन्याला घेउन कुस्ती खेळायला नदीपलिकडच्या त्या वाळवंटात जाणं,
भांडून गरम झालेल्या दिन्यालाच कोल्ड ड्रिंक पाजून थंड करून तुझ ते विजयोत्सव साजरा करणं!
पत्ते, गोट्या, भवरे, विट्ट्या सारख्या हलक्या खेळांचा मनमुराद आनंद लुटनं,
अन क्रिकेट, कॅरम सारख्या जड खेळांमध्ये विशेष प्राविण्य दाखवणं!
मामाने चिरून दिलेल्या कलिंगडाच्या त्या फाका मीठ लावून खाणं,
अन राहिलेल्या साली चेहऱ्याला लावून गोरे व्हायचा तो अयशस्वी प्रयत्न करणं!
सरसर झाडावर चढून चिंचा आंबे तोडणं,
अन मागच्या माडीत बसून लपून छपून मिटक्या मारत खानं!
कोणतीही गोष्ट करायला कायम एका पायावर तयार असणं,
अन तुझं ते इलेक्ट्रॉनिक डोकं वापरून समस्या निराकरणाच्या शकली लढवनं!

पशा असताना तू खऱ्या अर्थानं आपल्या मामाच गाव जगला होता,
अन तुझे मामेभाऊ आत्तेगावी आल्यावर त्यांनाही शहरी जगण्याचा भरपूर अनुभव तू दिला होतास!

पण कधी वाढदिवस आले आणि दिवस मागे सरकत गेले हे कळलेच नाही,
आमच्या पशाचा प्रशांत अन प्रशांतचे प्रशांत शेठ कधी झाले जानवलेच नाही!

खण आळीतल्या नामांकित नवरंग शोरूमचे शेठ आज तुम्ही मालक,
त्यातल्या त्यात झगमगीत सिल्क सेक्शन चे संचालक,
एकू ना एक साडी अन साडीची किनार शेठ असते लक्षात तुमच्या,
तुमचा क्लाइंट ही नाही जात शब्दाबाहेर आपल्या प्रशांतशेठ च्या,
आत्ताच तब्बल सतरा दिवसांचा लांबलचक दौरा तुमचा झाला,
निवडक स्थळी जाऊन निवडक माल शेठ तुम्ही टिपला,
तुमच्या चॉईस चा नाद कुणी करत नाही,
तुमच्या धंद्यातील एनर्जेटिक उत्साहाचा ठाव कुणाला लागत नाही!

दुकानदारी सांभाळत तुमच्या किल्लेदार मित्रांबरोबरही तुम्ही रमता,
त्यातल्या त्यात मंडईच्या राजावर जास्त जीव लावता!

आशिष साठी न चुकता आवर्जून पान खिशात ठेवता,
लहान असल्याने माझा काही उपयोग नाही म्हणून मला मात्र रीतसर विसरता!

आपल्या सेक्सी एस एट च्या कॅमेऱ्यात तुम्ही स्किल फुल्ड फोटो काढता,
काढलेले फोटो वेगवेगळे इफेक्त देऊन आवर्जून शेअर ही करता!

राजे, तुमच्या प्रकटदीनाचं शुभचिंतन करताना अर्थातच आम्हाला असीम आनंद होत आहे,
तुमच्या सोबत जगलेलं ते बालपण जरा मोठ्ठ होऊन जगायला मन द्रवत आहे,
होऊन गेलेलंच भावून जात हा खरं निसर्ग नियमच आहे,
म्हणून भविष्यात इतिहास होणारा आजचा वर्तमान कायम सुखासमाधानाने जगणं यातच खरा परमार्थ आहे!!

प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा बॉस!! 
द्या दंगा उसळून त्या कधीही शांत न राहणाऱ्या प्रशांत महासागराप्रमाणे!! 
घालून टाका पार्टीचा महाप्रसाद या शुभेच्छांच्या निमित्ताने!! 

- D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...