Close

Santosh Sangle - The Birthday Boy

शांत, संयमी, निश्चल मनाचे सवंगड्यांचे रानादा,
सांगळेंचे दादा! 
दादा, मारली वयाची फिफ्टी तरी खेळताय अजून ट्वेन्टी ट्वेन्टी
शंभर किलोचं पोतं उचलणारी फिट्ट तुमची शरीरयष्टी!

तारळे-उंब्रज खोऱ्यात तुमच्या कर्तृत्वाची दादा ऑलरेडी कीर्ती,
काहीतरी कॉंक्रीट करून दाखविण्यास मन देतय तूम्हाला अजूनही स्फूर्ती!

दादा, सद्गुरू वचनांवर चालणारं आचरण तुमचं,
तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ हे असे भाग्य आमचं!

वीसएक वर्षांचा फरक विसरायला लावणारी मैत्री आपली,
अशा मैत्रीची कित्येक नाती दादा तुम्ही असतील जपली!

कृत्रिम दातांसारखी भासणारी दादा ती दंतपंक्ती तुमची,
सदा देते ते निखळ हास्य साक्ष सकारात्मक लहरीची!

आयुष्याने वाढलेल्या मानसिक आघातांवर दादा केलेय तुम्ही मात,
मदतीचा हात सदैव पुढे करणारे दादा, उगाच का तुम्ही आमचे आदर्श आहात!

कमालीच्या आवड आणि सहजतेने रिक्षा पासून ट्रक चालविणारं दादा ड्रायव्हिंग तुमचं,
लाभाया ते सारथ्य सदा आसुसलेलं असतं हावरं मन आमचं!

उंब्रजात जरी स्थित असला दादा तरी जोडलेय तुमची आपल्या तारळ्याशीच नाळ,
गावी येण्याचा बहाणा शोधाया वाट पाही मन तुमचं सदा सर्वकाळ!

दादा, सरली पन्नाशी तरी तुमची कामाची हौस नाही जिरली,
उत्साह अन एनर्जी तुमच्या कामाची आम्ही याची देही याची डोळाहे पाहिली!

दादा, तुमच्या काम अन व्यवसायाचा डोलारा उत्तरोत्तर फुलतच राहो,
तुमच्या चेहऱ्यावरचं हे तरल हास्य असच निरंतर वाहो!

दादा, आज वाढदिवस तुमचा 
होणार जल्लोष आमचा!
तारळे-सातारा-उंब्रज खोऱ्यांतून डझनावर मावळ दौडणार,
कराडच्या सांज-सावली मध्ये येऊन विसावणार!
पंच-पक्वान्नांचा नैवेद्य लागणार,
तुमच्या प्रकटदिनाचं अभिष्टचिंतन होणार,
दादा, तुमच्या प्रकटदिनाच अभिष्टचिंतन होणार !!!

प्रतिष्ठित उद्योजक, सवंगडी ग्रुप चे जेष्ठ आधारस्तंभ, आमचे परममित्र श्री संतोषशेठ सांगळे ( Santosh Sangle ) उर्फ दादा यांना त्यांच्या तमाम मित्र समुदायाकडून वयाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या पन्नास कोटी पन्नास लाख पन्नास हजार पाचशे पंचावन्न पॉईंट पंचावन्न शुभेच्छा!! 

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...